देशातील 18 वर्षावरील नागरिकांना लस मोफत मिळणार; पंतप्रधान मोदींची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनासंकटाच्या पार्श्वभूमीवर देशाला संबोधित केलं. येत्या 21 जूनपासून देशातील 18 वर्षावरील नागरिकांना मोफत लस देईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. याआधी ही जबाबदारी राज्य सरकारांकडे देण्यात आली होती. पण मोदींनी आज जनतेशी संवाद साधताना केंद्र सरकारनं आता राज्य सरकारांना दिलेली लसीकरणाची २५ टक्क्यांची जबाबदारी देखील स्वत:वर घ्यायचं ठरवलं आहे, असं जाहीर केलं.

केंद्र सरकार मोफत लस उपलब्ध करुन देणार असलं तरी ज्यांना पैसे देऊन खासगी रुग्णालयांकडून लस घ्यायची असेल त्यांचाही विचार करण्यात आल्याचं मोदी म्हणाले. “ज्यांना पैसे देऊन लस घ्यायची आहे त्यांच्यासाठी एकूण लस उत्पादनापैकी २५ टक्के लस खासगी रुग्णालयांना उपलब्ध करुन दिल्या जातील.

मागील वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन लावावा लागला, त्यावेळी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेनुसार ८ महिने मोफत राशन पुरवलं. यावर्षीही दुसऱ्या लाटेमुळे मे आणि जूनपर्यंत ही योजना राबवण्यात आली. ही योजना आता दीपावलीपर्यंत लागू असेल. महामारीच्याकाळात सरकार गरिबांसाठी त्यांचा साथी बनून उभं आहे. नोव्हेंबरपर्यंत 80 कोटी लोकांना मोफत धान्य मिळेल.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment