तुझं यश प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देणारं; मोदींकडून मीराबाई चानूचे कौतुक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज टोकियो ऑलिम्पिकचा दुसऱ्या दिवशी वेटलिफ्टर मीराबाई चानूने 49 किलोग्राम वर्गात एकूण 202 वजनासह रौप्य पदक (Silver Medal) भारताला मिळवून दिलं आहे. मीराबाई यांच्या यशाने भारताने ओलीम्पिक मध्ये आपलं खातं उघडलं आहे. तिच्या या यशानंतर सर्वत्र कौतुकांचा वर्षाव होत असून आता पंतप्रधान मोदींनी देखील मीराबाई यांचं अभिनंदन केले आहे.

मोदी म्हणाले, टोकयो ऑलिम्पिकची यापेक्षा चांगली सुरूवात होऊ शकत नाही. मीराबाई चानूच्या दमदार कामगिरीमुळे संपूर्ण देशात उत्साह आहे. वेटलिफ्टिंगमध्ये सिल्व्हर मेडल जिंकल्याबद्दल अभिनंदन. तुझं यश प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देणारं आहे.’

दरम्यान, भारोत्तोलनाच्या महिलांच्या ४९ किलो वजनी गटात मीराबाई चानू हिने स्नॅचमध्ये ८७ आणि क्लिन व जर्कमध्ये ११५ किलो असे मिळून २०२ किले वजन उचलले आणि रौप्य पदावर नाव कोरले. मीराबाई चानू ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी दुसरी वेटलिफ्टर ठरली आहे. यापूर्वी दिग्गज खेळाडू कर्नाम मल्लेश्वरीने 2000 मध्ये सिडनी येथील ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते.

Leave a Comment