पंतप्रधान मोदींनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना लावला फोन; म्हणाले की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रशिया आणि युक्रेन मधील सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्रध्यक्ष रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी संवाद साधला आहे. रशियानं युद्ध थांबवावं आणि नाटोसोबत संवाद साधावा. नाटो आणि रशियानं चर्चेतून मार्ग काढावा, असं आवाहन मोदींनी केलं.

रशिया आणि नाटो यांच्यातील मतभेद प्रामाणिक संवादानेच सोडवले जाऊ शकतात, असा विश्वास मोदींनी पुन्हा एकदा व्यक्त केला. तसेच राजनयिक वाटाघाटी आणि संवादाच्या मार्गावर परत येण्यासाठी सर्व बाजूंनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केलं आहे.

यावेळी रशियन अध्यक्षांनी मोदींना युक्रेनमधील लष्करी कारवाईची माहिती दिली. पुतीन यांच्याशी संवाद साधताना मोदींनी युक्रेनमधील भारतीयांबद्दल, विशेषत: विद्यार्थ्यांबद्दल चिंता व्यक्त केली. अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यास सर्वोच्च प्राधान्य असल्याचं मोदींनी पुतीन यांनी सांगितलं.