मोदींना कृषी कायद्याप्रमाणेच ‘अग्निपथ’ परत घ्यावा लागेल- राहुल गांधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रातील मोदी सरकारने अग्निपथ या योजने अंतर्गत लष्करात युवकांना भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या योजनेअंतर्गत तरुणांना केवळ चार वर्षांसाठीच सैन्यात भरती केली जाणार असल्याचे म्हटले आहे.त्यानंतर देशभरातील विरोधकांनी सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही याबाबत टीका करताना मोदींना ही योजना मागे घ्यावीच लागेल अस म्हंटल आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हंटल, सलग 8 वर्षे भाजप सरकारने ‘जय जवान, जय किसान’च्या मूल्यांचा अवमान केला आहे. पंतप्रधानांना काळा शेती कायदा मागे घ्यावा लागेल, असे मी यापूर्वीही म्हटले होते. त्याचप्रमाणे त्यांना ‘माफिवीर’ बनून देशातील तरुणाईची आज्ञा पाळावी लागेल आणि ‘अग्निपथ’ परत घ्यावा लागेल.

दरम्यान, केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेनंतर देशभरातील युवक आक्रमक झाला आहे. अनेक ठिकाणी रेल्वे जाळून या युवकांनी आपला रोष व्यक्त केला आहे. या हिंसक आंदोलनाचा तीनशेहून अधिक ट्रेन्सना फटका बसल्याचं समोर आलं आहे.

Leave a Comment