PM मोदींच्या आईंचे निधन; 100 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)  यांच्या मातोश्री हिराबेन मोदी (Heeraben Modi) यांचे निधन झाले आहे. 2 दिवसांपूर्वी त्यांना अहमदाबादच्या यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हीराबेन यांच्या निधनावर सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.

एक तेजस्वी शतक ईश्वराच्या चरणी विलीन झालं,” असं म्हणत पंतप्रधान मोदींनी आईच्या निधनाबाबत माहिती दिली आहे. हिराबेन यांचा हातामध्ये दिवा घेऊन असलेला फोटो शेअर करत, “आईमध्ये मी कायमच त्या त्रिमूर्तिचा अनूभव घेतला ज्यात एक तपस्व्याची यात्रा, निष्काम कर्मयोग्याचं प्रतीक आणि मूल्य दिसून आली,” असं मोदी म्हणाले आहेत.

जेव्हा मी तिला तिच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त भेटलो होतो तेव्हा तिने मला एक गोष्ट सांगितली होती ती म्हणजे, बुद्धीने काम करा आणि शुद्धपणे आयुष्य जगा अशी आठवणही मोदींनी सांगितली.

हीराबेन मोदी यांचा जन्म 18 जून 1923 मध्ये झाला होता. याच वर्षी त्यांनी वयाची शंभरी गाठली होती. त्यानिमित्ताने त्यांचा वाढदिवसही मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला होता. स्वतः मोदी आईच्या वाढदिवसासाठी गांधीनगरला आले होते. त्यांनी आईचे पाय धुवून आशीर्वादही घेतले होते. हिराबेन मोदी यांचा पंतप्रधान मोदींना मोठा आधार होता. मोदी आणि त्यांच्या आईंचे एकमेकांप्रति असलेलं प्रेम हे संपूर्ण देशाला माहीत आहे. आज त्यांच्या निधनाने मोदींचा आधारच हरपला अस म्हंटल तरी वावग ठरणार नाही.