पांडुरंग हरी! म्हणतं पंतप्रधान मोदींनी दिल्या आषाढीच्या शुभेच्छा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । आषाढी एकदशीच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारकरी परंपरेच्या इतिहासाला उजाळा दिला आहे. विशेष म्हणजे जय जय पांडुरंग हरी म्हणत पंतप्रधान मोदी खास यांनी मराठीतून सर्वांना आषाढीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून ट्विट केलं आहे.

“विठ्ठलाच्या आशीर्वादाने गरीब आणि वंचितांना उत्तम आरोग्य आणि भरभराट लाभो. आपले जग आनंदी आणि आरोग्यदायी रहावे, या आपल्या निर्धाराला विठ्ठलाचे आशीर्वाद राहोत हीच विठ्ठल चरणी प्रार्थना. जय जय पांडुरंग हरी”, असं ट्विट करत मोदी यांनी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या पुढील ट्विटमध्ये संत परंपरेची आठवण करून देत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले कि, ”आषाढी एकादशी म्हणजे वारकरी परंपरेचे स्मरण करण्याचा दिवस. संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, रामदास, तुकाराम आणि इतर अनेक संत ज्यांनी समानता आणि सामाजिक सलोखा यांची शिकवण देत आपल्याला सदैव प्रेरणा दिली, अशा सर्व संतांना नमन.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.” 

 

Leave a Comment