व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

डबल इंजिन सरकारमुळे मुंबईच्या विकासाला गती; मोदींनी फुंकले BMC निवडणुकीचे रणशिंग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपच्या डबल इंजिन सरकारमुळे मुंबईच्या विकासाला गती मिळाली आहे. मुंबईच्या विकासासाठी आपल्याकडे पैशाची कमतरता नाही. विकास हवा असेल तर दिल्ली ते महाराष्ट्र आणि महाराष्ट्र ते मुंबई एक सत्ता पाहिजे असं म्हणत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले. आज मुंबईतील विविध प्रकल्पाचे उदघाटन आणि भूमिपुजन मोदींच्या हस्ते पार पडले. यावेळी बीकेसी येतील आयोजित सभेत मोदी बोलत होते.

मुंबई विकासापासून कधीही दूर जाऊ शकत नाही. महाविकास आघाडीच्या मधल्या काळात विकास रखडला मात्र शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर विकासाला गती मिळाली. डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळाली. हे डबल इंजिन सरकार मुंबईचा कायापालट करणार आहे. मुंबई महापालिकेवर सत्ता आल्यास अजून मुंबईचा विकास होईल. मुंबईच्या विकासासाठी पैशाची कमतरता नाही असं मोदी म्हणाले.

कोस्टल रोड, इंदूमिल स्मारक, धारावी पुनर्विकास, मेट्रो, नवी मुंबई विमानतळ यामुळे मुंबईच्या विकासाला ताकद देत आहेत. विकासाचा पैसे योग्य ठिकाणी लागला तरच खरा विकास होईल . विकासाच्या पैशातून भ्रष्ट्राचार झाला तर पैसा बँकेतच राहील आणि मग विकास कसा होणार असा सवाल करत भाजप कधीही विकासाच्या आड येत नाही, किंवा राजकीय स्वार्थासाठी विकासाला कधीही ब्रेक लावत नाही असा टोलाही मोदींनी विरोधकांना लगावला.