व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

शिंजो आबे यांच्या निधनाने मोदीही हळहळले; ट्विट करत वाहिली श्रद्धांजली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. यानंतर जगभरातून मान्यवर त्यांना आदरांजली वाहत आहेत. शिंजो यांनी पहिल्यापासून भारताशी चांगले आणि मैत्रीपूर्ण संबंध ठेवलं होते. त्याच पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिंजो यांच्याप्रति आपल्या भावना व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून शिंजो आबे यांच्याप्रती शोक व्यक्त केला आहे. माझ्या सर्वात प्रिय मित्रांपैकी एक शिंजो आबे यांच्या दुःखद निधनाने मला धक्का बसला आहे. ते एक जागतिक राजकारणी, एक उत्कृष्ट नेता आणि एक उल्लेखनीय प्रशासक होते. जपान आणि जगाला घडवण्यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले, अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

तर दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील शिंजो आबे यांना श्रद्धांजली अर्पण केली. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या निधनाने खूप दु:ख झाले आहे. भारत आणि जपान यांच्यातील धोरणात्मक संबंध दृढ करण्यात त्यांची भूमिका प्रशंसनीय होती. त्यांच्या कुटुंबियांबद्दल आणि जपानच्या लोकांप्रती माझ्या संवेदना अस राहुल गांधी म्हणाले.

दरम्यान, शिंजो आबे हे नारो या शहरात भाषण करत होते. त्यावेळी आरोपीनं पाठीमागून त्यांच्यावर गोळीबार केला. हल्लेखोरांनं त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्याची माहिती आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचे दुर्दैवी निधन झाले. जपानी पोलिसांनी संशयित हल्लेखोराला अटक केली आहे.