PNB कडून ग्राहकांना धक्का, बँकेने कर्जावरील व्याजदरात केली वाढ !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PNB : पंजाब नॅशनल बँकेकडून आपल्या सर्व कालावधीच्या कर्जावरील व्याजदर वाढवण्यात आले ​​आहेत. PNB ने आता आपल्या मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR) मध्ये 10 बेस पॉइंट्स किंवा 0.10 टक्क्यांनी वाढ केली ​​आहे. हे नवीन व्याजदर 1 ऑगस्टपासून लागू झाले आहेत.

Punjab National Bank clocks ₹506 crore profit in Q3 | Mint

हे लक्षात घ्या कि, कर्जाचे व्याज ठरवण्यात MCLR महत्त्वाची भूमिका बजावते. RBI च्या चलनविषयक धोरण समितीची (MPC) बैठकी दरम्यान PNB कडून MCLR मध्ये वाढ करण्यात आली आहे. या बैठकीत पुन्हा एकदा रेपो दरात वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र रेपो दरात वाढ झाल्यास बँकांकडून पुन्हा व्याजदर वाढवले जातील.

Punjab National Bank's profit more than doubles to Rs 1,127 cr in Dec  quarter | The Financial Express

MCLR मध्ये वाढ झाल्याने आता बँकेच्या ग्राहकांच्या कर्जाच्या EMI मध्ये वाढ होईल. PNB ने ओव्हरनाइट लोनसाठीचा MCLR 6.90 टक्क्यांवरून 7.00 टक्के केला आहे. तर एक महिना, तीन महिने आणि सहा महिन्यांसाठीचे दर अनुक्रमे 0.10 टक्क्यांनी वाढवून 7.05 टक्के, 7.15 टक्के आणि 7.35 टक्के करण्यात आले आहेत. त्याच वेळी, एक वर्षाच्या लोनसाठीचा MCLR 7.55 टक्क्यांवरून 7.65 टक्के करण्यात आला आहे. याशिवाय 3 वर्षांच्या लोनसाठीचा MCLR 7.85 टक्क्यांवरून 7.95 टक्के करण्यात आला आहे.

PNB Q1 results: Net profit slumps 70% YoY to Rs 308 cr - BusinessToday

MCLR मध्ये वाढ केल्याने आता PNB चे होम लोन, ऑटो लोन आणि पर्सनल लोन महागतील. मात्र, ज्यांनी आधीच होम लोन घेतले आहे अशा कर्जदारांनी हे लक्षात ठेवावे की, जेव्हा त्यांच्या कर्जाची रीसेट तारीख येईल तेव्हाच EMI मध्ये वाढ करण्यात येईल. रिसेट तारखेला, बँक सध्याच्या MCLR वर आधारित कर्जदारांच्या होम लोनवरील व्याजदर सुधारित करेल. याचा अर्थ असा की, जर एखाद्याचे होम लोन MCLR वर आधारित असेल आणि रिसेट तारीख सप्टेंबरमध्ये असेल, तर त्याला सप्टेंबरपासून वाढलेला EMI भरावा लागेल. तोपर्यंत कर्जदाराला त्याच्या सध्याच्या दरांनुसारच पेमेंट करावे लागेल.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.pnbindia.in/interst-rate-on-advances-linked-to-mclr.html

हे पण वाचा :

‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना केले मालामाल !!!

Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये मिळणार Netflix, Amazon Prime चे फ्री सबस्क्रिप्शन !!!

पेन्शनधारकांसाठी EPFO ​​ने सुरू केली नवी सुविधा !!!

Bank of Baroda कडून पेमेंट्सशी संबंधित नवीन नियम आजपासून लागू !!!

Gold Price Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण !!! नवीन दर पहा