औरंगाबाद : बाजार समिती मधील भाजी मंडई शॉपिंग सेंटर च्या गच्चीवर 21 मे रोजी दादाराव यांचा खून करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा तपास सुरू केला. या खुनाच्या तपासासाठी सिडको पोलिसांनी दोन पथके नेमली होती. त्यानुसार सोमवारी घटनेतील संशयित भाजीमंडई च्या परिसरात आल्याची माहिती सिडकोचे पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना कळाली होती. त्यानंतर उपनिरीक्षक कल्याण शेळके बाळासाहेब आहेर व पथकाने सुनील भिंगोरे यास घेतले.
हाती आलेल्या माहितीनुसार, सुनील भिंगारे आणि त्याची प्रेयसी हे 20 मे रोजी रात्री दहा वाजता भाजी मंडई येथील सृष्टी एजन्सीच्या छतावर आले होते. त्यावेळी मृत्यू दादाराव आगोदरच तिथे बसलेला होता. काही अंतरावर सुनील आणि त्याची प्रेयसी जाऊन बसले. सुनील काही वेळाने लघुशंकेसाठी गेला होता. तेव्हा दादारावने त्याच्या प्रेयसीची छेड काढली. हे सुनीलने पाहिले आणि रागाच्या भरात बाजूला पडलेला सिमेंटचा गट्टू उचलून दादाराव च्या डोक्यात दोन ते तीन वेळेला मारला. यातच दादारावचा मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, दादारावच्या डोक्यात दगड मारल्यानंतर सुनील व त्याची प्रेयसी तिथून निघून गेले होते असेही पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, उपायुक्त दीपक गिऱ्हे, सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कल्याण शेळके, बाळासाहेब आहेर, सुभाष शेवाळे, नरसिंग पवार, प्रकाश डोंगरे, सुरज भिसे, प्रशांत सोनवणे, गणेश नागरे, स्वप्नील रत्नपारखी यांच्या पथकाने केली.