अल्पवयीन मुलीला पळविनाऱ्याला पोलीसांनी केली अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवून नेले आणि तिच्यावर अत्याचार करण्यास अजिंठा पोलिसांनी सोमवारी औरंगाबाददेतील मध्यवर्ती बसस्थानकात अटक केली. आकाश दिलीप दांडगे ( वय 21) असे आरोपीचे नाव असून त्याला 17 जून पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी मंगळवारी दिले.

17 वर्षीय पिडितेच्या आईने फिर्याद दिली. त्यानुसार 12 जुन पासुन रोजी सायंकाळी पिडिता ही वहिनीच्या घरी जावून येते असे सांगून घरातून गेली होती. रात्र झाली तरी पीडिता घरी न परतल्याने फिर्यादी व तिच्या नातेवाईकांनी तिचा शोध घेतला मात्र ती सापडली नाही. अजिंठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात झाला असून. तपास सुरू असताना अजिंठा पोलिसांनी औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानकातुन आरोपीला अटक केली तर पीडितेला ताब्यात घेतले. पीडितेने जबाब दिला की, आरोपी व तिच्यात सातवीपासून प्रेमसंबंध होते. 12 जुन रोजी सायंकाळी आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून दुचाकीवर फुलंब्री येथे पळवून नेले. तेथे सर्व दुकाने बंद असल्याने ते बसस्थानका जवळील एका पत्राच्या शेडमध्ये थांबले. तेथेच आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. दुसर्‍या दिवशी पहाटे ते दोघे दुचाकीवर औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानकावर आले.

तेथून ते रात्रीच्या बसने मुंबईला जाणार होते, त्यासाठी आरोपीने तिकीट देखील काढले होते. दरम्यान सायंकाळी सहाच्या सुमारास बसस्थानकावर आकाशचे काका भेटले. त्यांनी आकाशकडे विचारणा केली असता त्याने मुंबईला पळून चालल्याचे सांगितले. आकाशाच्या काकांनी ही माहिती अजिंठा पोलिसांना दिली होती.

Leave a Comment