धनंजय मुंडेंना धमकी देणाऱ्या ‘त्या’ महिलेला अटक; दुसरी तिसरी कोणी नसून…..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना पैशाची मागणी करून धमकी देणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही महिला दुसरी तिसरी कोणी नसून करुणा शर्मा यांची बहीण रेणू शर्मा आहे. रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्याकडे 5 कोटींची मागणी करत पैसे न दिल्यास बलात्काराची तक्रार दाखल करेन अशी धमकी दिली होती. त्यानंतर मुंबईच्या गुन्हे शाखेने तिला आज अटक केली आहे.

याप्रकरणी धनंजय मुंडे यांनी मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यावेळी त्यांनी तक्रारीत रेणु शर्मा यांनी दिलेल्या धमकीचा मेसेज सांगितला होता. पिछले साल एक कागज सोशल मीडिया पर डाला तो तुम्हारा मंत्रीपद जानेकीं नौबत आ गई थी। अब अगर मेरी मांग पूरी नहीं की तो बदनाम कर दुँगी। अगर मंत्री पद बचाना चाहते हो, तो दस करोड कौनसी बडी बात है?”,असा मॅसेज तिने मुंडेंना पाठविला होता अस धनंजय मुंडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले होते.

कोण आहेत रेणू शर्मा-
रेणू शर्मा या मूळच्या मध्यप्रदेश येथील इंदौर मधील असून त्या करुणा शर्मा यांची बहीण आहेत. धनंजय मुंडे यांच्या तक्रारीनंतर मुंबई क्राईम ब्रँच व इंदौर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तिला अटक करून आधी ( इंदौर कोर्टात हजर केले होते. इंदोर कोर्टाने तिला रिमांड दिला आणि त्यानंतर आज तिला पुढील चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.