आमदाराच्या विरोधात बातमी लावली म्हणुन पोलिसांनी उघडं करुन मारलं?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मध्यप्रदेश येथे भाजप आमदारा विरोधात बातमी लावल्याने पत्रकारांना पोलीस स्टेशन मध्ये उघडे करून मारल्याची घटना समोर येत आहे. सदर पत्रकारांचे उघडे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. भाजप आमदार केदारनाथ शुक्ला यांच्याविरोधात बातमी दिल्यानं पोलिसांनी अटकेची कारवाई केली.

याप्रकरणी पोलीस इंचार्ज मुकेश सोनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नीरज कुंदर यांनी नकली फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून अनेकदा अवमानजनक टिपण्णी केली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. मात्र नीरज कुंदर या थिएटर कलाकाराला अटक केल्यानंतर कनिष्क तिवारी नावाच्या युट्यूब पत्रकारासह काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी कलाकाराच्या अटकेविरोधात पोलिस ठाण्यात घोषणाबाजी केली. तसेच पोलिस आणि राज्य सरकारवर टीका केली. त्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली.

तर दुसरीकडे कनिष्क तिवारी यांच्या म्हणण्यानुसार ते वृत्तांकन करण्यासाठी पोलीस ठाण्याबाहेर गेले होते. वृत्तांकन करत असताना पोलिसांनी त्यांच्या सह कॅमेरामनला अटक केल्याचं त्यांनी सांगितलं. पोलिसांनी अटक करून जवळपास १८ तास तुरुंगात ठेवलं, त्यांनी आम्हाला मारहाण केली आणि कपडे काढायला लावले, असा आरोप तिवारींनी केला. शांततेचा भंग केल्याचा, अतिक्रण केल्याची कलमं त्यांच्यावर लावण्यात आली. आमदाराच्या विरोधात बातम्या कशाला करता, अशी विचारणा पोलिसांनी केल्याचं तिवारींनी सांगितलं.

Leave a Comment