औरंगाबाद | चिकलठाणा परिसरात खरेदी केलेल्या जमिनीचा वाटणी पत्राच्या आधारे फेर घेण्यासाठी तहसीलदाराचे आदेश घेऊन देण्यासाठी 1 लाख 5 हजारांची मागणी करून 70 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या अव्वल कारकूनसह एकाला 16 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. देशपांडे यांनी दिले.
प्रदिप हरिभाऊ आखरे (वय 49) असे त्या कारकुनाचे नाव असून केलास लिंगायत रा. पैठण असे त्या खाजगी व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली होती. त्यानुसार तक्रारदाराने चिकलठाणा परिसरात जमीन खरेदी केली होती. जमिनीच्या वाटचाली पत्राच्या आधारे फेर घ्यायचा होता. हा फेर घेण्यासाठी तहसीलदारांचे आदेश घेऊन देतो असे म्हणत तहसील कार्यालयातील अव्वल कारकून आखरेने खासगी व्यक्तीच्या मदतीने 2 जुलै रोजी 55 हजारांची आणि 6 जुलै रोजी 70 हजार रुपयांची लाच माघितली. तडजोडीअंती 70 हजार लाच घेण्याचे ठरले.
दरम्यान 13 जुलै रोजी कारकुणाने 70 हजारांची लाच स्वीकारली. त्याचवेळी सापळा लावलेल्या एस बी च्या पथकाने दोघांनाही अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांना 16 जुलैपर्यंत पोलिस ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. प्रकरणात अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील मुंडवाडकर यांनी काम पहिले.