व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

1300 किलोमीटर पाठलाग करत पोलिसांनी घेतला 12 लाखांचा माल ताब्यात

औरंगाबाद – निपाणी येथील कलरच्या गोदाममधून 12 लाख 61 हजार 195 रुपयांचे 1724 डबे घेऊन पोबारा करणाऱ्या भामट्या चिकलठाणा पोलिसांनी 1300 किलोमीटर प्रवास करत मुद्देमालासह शोधून आणले. या गुन्ह्यातील 100 टक्के मुद्देमाल परत मिळविण्यात पोलिसांना यश मिळाल्याची माहिती निरीक्षक देविदास गात यांनी दिली.

निपाणी येथील गोडाऊनमधून ज्ञानेश्वर सोनोने यांचा विश्वास संपादन करून एका भामट्याने भाड्याचा बनाव परत गोडाऊन मधील पेंटचा माल पळवून नेला होता.‌ याप्रकरणी गुन्हा नोंदवल्यानंतर तपास अधिकारी सहाय्यक निरीक्षक शरदचंद्र रोडगे हे पोलीस अधीक्षक निमित गोयल यांची परवानगी घेऊन पथकासह थेट मध्य प्रदेशात पोहोचले. या प्रकरणात लोकेश केदार अमोल कुंभज (45, रा. वैभवनगर, इंदौर, मध्य प्रदेश) हा आरोपी असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यास ताब्यात घेऊन पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने किशोर नावाच्या व्यक्तीला माल दिल्याचे सांगितले. आरोपीने पळवलेला माल बगवण्य या गावात दडवला असल्याचे सांगितले. चोरीचा माल ठेवलेल्या गोडाऊनवर पोलिस पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने छापा मारला तेव्हा पंचनामासह 12 लाख 61 हजार 195 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या गुन्ह्यात लोकेशला अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. चिकलठाणा पोलिसांनी 100 टक्के मुद्देमाल शोधून काढला आहे. ही कामगिरी निरीक्षक देविदास गात यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे जमादार थोटे दिपक सुरोशे यांच्या पथकाने केली.