अटकपूर्व जामीन फेटाळताच पलायन करणाऱ्या डाॅक्टरला पाठलाग करून पोलिसांनी पकडले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली | सांगली जिल्ह्यातील मिरज येथील अॅपेक्स केअर हॉस्पिटलचे संचालक डॉ. महेश जाधव याला शुक्रवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि कासेगाव पोलिसांच्या संयुक्त पथकाने पाठलाग करून पकडले. उपचारात हलगर्जीपणा व रुग्णांच्या मृतास कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली. सांगली जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर डाॅ. जाधवने पलायन केले, मात्र पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले.

डॉ. महेश जाधव याला चाैकशीसाठी महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याकडे सुपूर्द केले आहे. त्याला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.  डॉ. जाधव याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी झाली. न्यायालयाने जामीन फेटाळताच तो पलायन करीत असताना त्याला पकडल्याचे पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी सांगितले.

जाधव याने हॉस्पिटलमध्ये पुरेशी यंत्रसामग्री नसतानाही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 205 रुग्णांना दाखल करून घेतले होते. त्यापैकी 87 जणांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉ. जाधव याने भरमसाट बिलांची आकारणी केली. तसेच डिस्जार्च झाल्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांना बिलाची पावती देण्यास देखील टाळाटाळ करण्यात येत होती. आवश्यकता नसतानाही अनेकांकडून मागविण्यात आल्याच्या घटना घडल्या होत्या. याबाबत जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांकडे रुग्णांच्या नातेवाईकांनी तक्रारी केल्या होत्या.

महापालिका आयुक्त, उपायुक्त, आरोग्य विभागाने डॉ. जाधव त्यानंतर महापालिका आयुक्त, उपायुक्त, आरोग्य विभागाने डॉ. जाधव याच्या हॉस्पिटलवर छापा टाकला होता. महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांनी नियमांचा भंग, भरमसाट बिले आकारून रुग्णांची फसवणूक आणि बिले देण्यास टाळाटाळ करणे अशी फिर्याद दिली.

पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच डॉ. जाधव याने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. यापूर्वीच महात्मा गांधी चौक पोलिसांनी डॉ. जाधव याच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल केला होता. शुक्रवारी अटकपूर्व जामीन अर्जावर सांगली सत्र न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने जामीन फेटाळल्याचे समजताच न्यायालयाच्या आवारात असणाऱ्या डॉ. जाधव याने तेथून पलायन केले. यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने डॉ. जाधव याचा पाठलाग सुरू केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि कासेगाव पोलिसांच्या संयुक्त पथकाने त्याला कासेगाव येथे पकडले.

Leave a Comment