श्रमिक मुक्ती दलाच्या कार्यकर्त्यांना स्थानबध्द प्रकरणी पोलिस प्रमुख, जिल्हाधिकाऱ्यांनी माफी मागावी : डाॅ. भारत पाटणकर

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

श्रमिक मुक्ती दलाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले ते व्यक्तिस्वातंत्र्याला मारक आहे. लोकशाही आणि घटनेच्या विरोधात आहे. त्यामुळे आमची मागणी अशी आहे, कोणतेही कारण नसताना स्थानबध्द केले असल्याने पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकाऱ्यांनी माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष भारत पाटणकर यांनी दिला आहे.

यावेळी बोलताना पाटणकर म्हणाले, कोयना धरणग्रस्तांचे पुनर्वसन करण्यास आम्ही तयार नाही हे म्हणणं चुकीच आहे. या सरकारच्या हातात ही जमीन असून ती लपवण्याच काम चालु आहे. तेव्हा जमीन लपविण्याचं काम चालू उपमुख्यमंत्र्यांनी हाणून पाडलं पाहिजे. कोयनेच्या पाण्यावर जिथे बागायत झाली आहे, ती जमीन तातडीने धरणग्रस्तांना दिली पाहिजे.

पूर्वीच्या मुख्यमंत्र्यासोबत दोन आताच्या उपमुख्यमंत्र्याच्या सोबत तीन बैठका झाल्या आहेत. तेव्हा कोयना धरणग्रस्तांच पुनर्वसन करण्याची आमची तयारी आहे. मात्र हे पुनर्वसन उपाशी मरण्याच्या ठिकाणी करु नये, तर कोयना धरणाच्या पाण्यातून बागायत झालेल्या ठिकाणी मिळावी, अशी मागणी भारत पाटणकर यांनी केली आहे.

You might also like