धक्कादायक ! गोंदियामध्ये पोलीस हवालदाराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गोंदिया : हॅलो महाराष्ट्र – गोंदिया जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका पोलीस हवालदाराने आपल्या राहत्या घराच्या वरांड्यात गळफास (Sucide) घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. गोंदिया जिल्ह्यातील देवरी या ठिकाणी हि घटना घडली आहे. महेश भुरे असे आत्महत्या (Sucide) करणाऱ्या पोलीस हवालदाराचे नाव असून ते देवरी पोलीस उप मुख्यालयात कार्यरत होते.

पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास केला असता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलीस हवालदार महेश भुरे हे गेल्या तीन वर्षांपासून गंभीर आजाराने ग्रस्त होते. त्यामुळे त्यांना असह्य त्रास सोसावा लागत होता. अखेर शेवटी महेश भुरे यांनी आजारपणामुळे नैराश्यात जावून आत्महत्या (Sucide) करण्याचा निर्णय घेतला.

पोलीस हवालदार महेश भुरे हे 2020 पासून गंभीर आजाराने ग्रस्त होते. आजाराच्या सततच्या वेदना त्यांना असह्य होत असल्यामुळे त्यांनी देवरी या ठिकाणी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Sucide) केली आहे. देवरी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद केली असून देवरी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हे पण वाचा :
निवडणूकीचा बिगूल वाजला ः राज्यात 92 नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर

आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू!!!

IND vs ENG 1st 20: Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार

‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर