ट्रक चालकांस लुबाडणाऱ्या तोतया तहसिलदारास पोलिस कोठडी

कराड तालुक्याली उंब्रज येथील एकाला मारहाण करत लुटले

कोल्हापूर | तहसीलदार असल्याचा बनाव करून चिरा वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकास अडवून मारहाण करून लुबाडणाऱ्या तोतया तहसिलदारांसह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

उंब्रज (ता. कराड) येथील ट्रक चालकांस नथुराम कांबळे ( रा. कोळगाव, ता. शाहूवाडी) व त्याचा साथीदार विष्णु विठ्ठल पारवे (रा. असेगाव ता. शाहूवाडी) यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून, दरम्यान विष्णू पारणे याला प्रथमवर्ग न्यायालयाने 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, रविवारी रात्री अकराच्या सुमारास चंद्रकांत गुलाबराव जाधव (रा. उंब्रज, ता. कराड) यांच्या ट्रक क्रमांक (एम. एच- 13 ए एस- 4361) मधून चिरा दगड घेऊन निघाले होते. यावेळी पेरीडनजीक नथुराम कांबळे व त्याचा साथीदार विष्णू पारवे मोटर सायकल (एम. एच 09- ईएफ- 8242) वरून आले होते. यावेळी दुचाकीवरील नथुरामने आपण तहसीलदार असल्याचे सांगत ट्रक चालकाकडे पासची मागणी केली. पास दाखवताच हा बनावट आहे, असे म्हणत ट्रक चालकांस ट्रक घेवून तहसील कार्यालय चल म्हणत मारहाण केली. तसेच गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली व जबरदस्तीने चालकाच्या खिशातील दोन हजार रुपये व पास घेऊन नथुराम पळाला. दरम्यान यावेळी झालेला ओरडा ऐकून जमलेल्या लोकांनी साथीदार विष्णू पारधे याला पकडले. त्याला पोलिस ठाण्यात हजर केले. तेव्हा पळून गेलेल्या नथुराम कांबळे यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत आहेत.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like