अमरावतीमध्ये चार दिवसांची संचार बंदी; परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठं पाऊल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | त्रिपुरा येथील मुस्लिम समाजावर होणाऱ्या अत्याचाराचे पडसाद महाराष्ट्रात उमटले असून ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत. त्यातच अमरावती येथील मोर्चाला हिंसक वळण लागले असून पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अमरावती शहरात 4 दिवस कर्फ्यु लावण्यात आला आहे.

अमरावती मध्ये 4 दिवसांसाठी हा जनता कर्फ्यु लावण्यात आला असून एसआरपीएफच्या 5 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. इंटरनेट सेवा 3 दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे. अमरावती मधील एकूणच तणाव पांगवण्यात पोलिसांना मोठी पराकाष्टा करावी लागत आहे.

प्रभारी पोलिस आयुक्त संदीप पाटील यांनी दुपारी दोन वाजतापासून शहरात कलम १४४ जमाबंदी लागू केले आहे. गेल्या महिन्यात त्रिपुरातील हिंसाचाराचा वणवा आता महाराष्ट्रात पोहोचला आहे. आजही राज्यात हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत. अमरावती, नांदेड आणि नाशिक या तीनही शहारांमध्ये वातावरण चिघळं असून अमरावतीच्या राजकमल चौकात भाजपसह अनेक संघटनांचे कार्यकर्ते जमले होते.

You might also like