पोलिस अधिकार्‍याची राहत्य‍ा घरी गळफास घेऊन आत्महत्या; सुसाईड नोट लिहून पत्नी, वडिलांची मागितली माफी

अमरावती | जिल्ह्यातील मेळघाटातील धारणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल तांबे यांनी आपल्या पोलीस निवासस्थानी गळफास लावून आत्महत्याची खळबळ जनक घटना आज दुपारी २ वाजता उघडकिस आली. मृत्यूपूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवून आपल्या पत्नी व वडिलांची माफी मागितली आहे.

धारणीचे पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांनी सांगितलेल्या माहितीनुसार सदर पोलीस अधिकारी हे २५ जानेवारीपासून रजेवर होते. आज त्याची पत्नी व वडील आले असता घरीच मृतदेह लटकून दिसला.

त्यामुळे लागलीच धारणी पोलीसानी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली तर १२ दिवसापासून हा अधिकारी पोलीस ठाण्यात आलेला नव्हता, मात्र त्याने आत्महत्या का केली याची माहिती मिळू शकली नाही तर या घटनेनंतर पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

You might also like