औरंगाबाद | चारचाकीला धक्का लागला म्हणून एका पोलीस अधिकाऱ्याने छोटा हत्ती चलकांचा चावी हिसकावत त्यास रस्त्यावरच शिवीगाळ करीत कानशिलात लागवल्याची घटना आज सकाळी आझाद चौकात घडल्याचे समोर येत आहे.या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशलमीडियावर व्हायरल होता आहे.
रस्त्याने जात असताना मालवाहू छोटा हत्ती वाहनांचा एका साह्ययक पोलीस निरीक्षकाच्या चारचाकी कारला धक्का लागला. राग अनावर झाल्याने त्या पोलीस अधिकाऱ्याने चालक तरुणाला शिवीगाळ केली. गाडीची चावीच काढून घेतली.चावी साठी तो तरुण त्या पोलिसांकडे विनवणी करू लागला.मला पोलिसात न्या, तुम्ही जिथे म्हणाल तिथे यायला तयार आहे. फक्त चावी द्या अशी वारंवार विनवणी तो तरुण पोलिसांकडे करत होता, मात्र त्या कडे लक्ष न देता त्या अधिकाऱ्याने रस्त्यावरच अश्लील भाषेत शिवीगाळ करीत तरुणांच्या कानशिलात लगावली.हा सर्वप्रकार उपस्थितांनी मोबाईल मध्ये कैद केला होता.या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल माध्यमावर व्हायरल होत आहे. ही घटना आज सकाळी औरंगाबाद शहरातील आझाद चौकात घडल्याचे समोर येत आहे.
हा व्हिडिओ कोणी बनविला.मारहाण करणारा तो पोलीस अधिकारी कोण आहे.व तो तरुण कुठला आहे.या बाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र पोलीस अधिकाऱ्यांचा अशा बेजबाबदार आणि मुजोरीपणामुळे पोलीसाप्रति राग सोशल माध्यमात व्यक्त केला जात आहे.