कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आजपासून जमावबंदी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत मोठ्या प्रमाणात नव्या कोरोना रुग्णांवाढ होत आहे. एकाच दिवसात तब्बल 2 हजार 510 नवे कोरोना रुग्ण एकट्या मुंबईत आढळून आल्याने प्रशासनाचे आणि सर्वसामान्य मुंबईकरांचे धाबे दणाणले आहेत. मुंबईसह राज्यावर, देशावर तिसऱ्या लाटेची टांगली तलवार आहे.असल्याने मुंबईत पोलीस व महानगर पालिकेकडून आजपासून पुढे सात दिवस जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.

सतत वाढत असलेल्या रुग्णवाढीमुळे मुंबई महापालिकाही अलर्ट झाली असून वाढत्या कोरोना रुग्णांच्यासाठी उपाययोजना करण्याचे काम महापालिका प्रशासनाच्यावतीने हाती घेण्यात आले आहे. महापालिकेने दिलेल्या आदेशानुसार 30 डिसेंबर 2021 च्या मध्यरात्री बारा वाजल्यापासून 7 जानेवारीच्या रात्री बारा वाजेपर्यंत बृहन्मुंबई पोलीस आयुक्तांच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व जागी हे आदेश लागू असतील.

या आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असेल. याशिवाय महामारी कायदा 1897 आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि इतर कायदेशीर तरतुदींखालील कारवाई केली जाणार असल्याचे आदेशात म्हंटले आहे.

मुंबई महापालिकेडून नवी नियमावलीही लागू –

१) हॉटेल व उपहारगृहांचे दैनंदिन सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार

२) महानगरपालिका आणि पोलीस प्रतिनिधींचे संयुक्त भरारी पथक लक्ष ठेवणार

३) मुंबई विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी केली जाणार

४) परदेशातील प्रवाशांना 7 दिवसाचे क्वारंटाईन सक्तीचे असणार

Leave a Comment