वाळूज परिसरातील अवैध कुंटनखान्यावर पोलिसांचा छापा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | वाळूज परिसरात सुरू असलेल्या कुंटुनखान्यावर वाळूज एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकला. यात मुकुंदवाडी भागात राहणाऱ्या ४१ वर्षीय महिलेने सात महिलांना बळजबरीने या व्यवसायात अडकवले होते. वाळूज परीसरात सुरू असलेल्या कुंतूनखाण्यावर वाळूज एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी छापा टाकला.त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांकडून ती १०० रुपये घेऊन ती पिडीतांना अर्धी रक्कम देत असत. स्वतःची जागा उपलब्ध करून देत ती हे पैसे घेत व उपजीविका करत असत.

तसेच सदर कुंटनखान्यावर एकूण २ पुरुष ग्राहक विशाल गोविंद आडे, (वय-२६ वर्ष, रा. विश्रांतीनगर, रेल्वेस्टेशन रोड, मुकुंदवाडी, औरंगाबाद) तर मोनू गयाप्रसाद सागर, (वय २८, रा. भगतसिंगनगर, जळगाव टि पॉइंटजवळ, हर्सूल, औरंगाबाद) आढळून आले. आरोपीची अंगझडती व घराच्या झडतील कॉन्डोमचे पाकीटे, वेश्याव्यवसायातून प्राप्त रोख रक्कम रुपये ७०८० पोलिसांच्या हाती लागले आहे. कुंटनखाना चालविणा-या महिलेस व दोन्ही ग्राहकांना गुन्ह्यात अटक करण्यात आली असून एकूण ७ पिडीत महिलांना महिला सुधारगृहात ठेवण्यात आलेले आहे.

वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सावंत यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. सपोनि गौतम बावळे, पोउपनि प्रशांत गंभीरराव, सफो. रामदास गाडेकर, पोना फकीरचंद फडे, नवाब शेख, संजय हंबीर, प्रदिप कुटे, बंडू गोरे, प्रकाश गायकवाड, मपोअं. आरती कुसाळे, सुनिता बहुरे सर्व नेमणूक पो.स्टे. एमआयडीसी वाळूज यांनी सदर कारवाई केली आहे.

Leave a Comment