Wednesday, June 7, 2023

पोलिसांचा दणका : सातारा जिल्ह्यात विनामास्क आढळल्यास 500 रूपये दंड

सातारा | वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकारी सातारा यांनी आदेश काढून निर्बंध आखून दिलेले आहेत. निर्बंधांचे पालन न करणाऱ्या जिल्ह्यातील व्यक्तींवर कारवाई दंड वसुल करण्यास सुरूवात केलेली आहे. सातारा शहरासह कराड शहरातही मास्क न वापरणाऱ्यावर दंडात्मक कारवाईचा सपाटा लावलेला आहे. जिल्ह्यात पाॅझिटीव्ह रेट वाढू लागल्याने पोलिसाकडून विनामास्क वाहन चालकांला 500 रूपयांचा दंड आकारला जात आहे.

सातारा जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागातील मोठया गांवामध्ये कोरोना नियमांचे पालन होत नसलेचे दिसून येत आहे. जिल्हयातील पोलीस प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासन, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार यांना मोठया आस्थापना व गर्दीचे ठिकाणे येथे भेट देऊन जेथे कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येईल तेथे दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

सातारा जिल्ह्यातील पोलीस प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासन यांचेमार्फत सातारा शहर, कराड शहरात विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. याठिकाणी दंडात्मक कारवाई सोबत वाहनेही जप्त करण्यात येत आहे. सातारा जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागातील स्थानिक प्रशासनाकडून वाहनाव्दारे व्यावसायिक तसेच इतर दुकानदार यांना त्यांचे आस्थापनांमध्ये मास्क घालणे, सामाजिक अंतर, सॅनिटायझरचा वापर करण्याबाबत लाऊडस्पिकरव्दारे सूचना देण्यात आलेल्या आहेत. तरीही मास्कचे वापर न करणाऱ्यावर 500 रूपयांचा दंड आकारला जात आहे.