नामांकित कंपनीच्या कारचे बनावट साहित्य विक्री करणाऱ्या दुकानांवर पोलिसांचा छापा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | नामांकित कंपनीचे बनावट कारचे साहित्य विक्री करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकला आहे. शनिवारी जालना रोडवरील आपणा कॉम्प्लेक्समध्ये पोलिसांनी दोन दुकानांवर कारवाई केली आहे. या कारवाईत 36 हजार 700 रुपयांचे बनावट स्पेअर पार्ट जप्त करण्यात आले.

गुरमीतसिंग कर्नलसिंग बिंद्रा (वय 55) रा. सिडको आणि अमित प्रेमचंद जैन (वय 40) रा. अहिंसानगर, महेशनगर असे दुकानदारांची नावे आहेत. अमित यांचे सेवा ऑटोमोबाईल तर गुरमीतसिंग यांचे कार डेकोरेटर्स ही दुकाने आहेत. त्यांच्या दुकानातून हुंदाई कारचे बनावट स्पेअर पार्ट विक्री होत असल्याची माहिती कंपनीचे वरिष्ठ अधिकारी नवनाथ विष्णू केकान यांना मिळाली होती.

त्यानुसार केकान यांनी जवाहरनगर पोलिसात तक्रार दिली होती. केकान यांच्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक संतोष पाटील व त्यांच्या पथकाने कार डेकोरेटर्स शॉप आणि सेवा ऑटोमोबाईल या दुकानावर छापा मारला. या कारवाईत हुंदाई कंपनीचे बनावट ओईल सील, कुलंट, हेडलाईट स्विच असेंबली, ऑल वॉकर, टी. पी. सेन्सर जप्त करण्यात आले.

Leave a Comment