या कारणामुळे मुख्यमंत्र्यांच्या सभेत पोलिसांनी चिमुकल्याचे जॅकेट उतरवले

गुवाहाटी प्रतिनिधी | भारतीय जनता पक्षाने सरकारचा निषेध करणार्‍या लोकांची चांगलीच धास्ती खाल्ली आहे. अलीकडच्या काही काळात कोणीतरी आपला निषेध करेल अशी भीती भाजप नेत्यांना वाटत असते. भाजप च्या अनेक सभांमधून त्याची प्रचिती आली आहे. असाच प्रकार अासाम चे मुख्यमत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या सभेत घडला. काळ्या रंगाचे जॅकेट परिधान केलेल्या एका चिमुकल्याला पोलिसांनी जॅकेट उतरवायला लावल्याने एकच खळबळ उडाली.

आसामची राजधानी गुवाहाटी येथे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गुवाहाटी आणि आसपास च्या परिसरातून अनेक नागरिक सभेसाठी जमले होते. यावेळी काळ्या रंगाची कपडे घालून येण्यास नागरिकांना मज्जाव करण्यात आला होता. दरम्यान एका चिमुकल्याला काळ्या रंगाचे जॅकेट घातल्यावरुन पोलीसांनी अडवले. विषेश म्हणजे पोलिसांनी त्या चिमुकल्याला आपले जॅकेट काढायला लावले. निषेध व्यक्त केला जाण्याच्या शक्यतेमुळे पोलिसांनी चक्क एका ३ वर्षांच्या मुलाच्या अंगातील काळ्या रंगाचे जॅकेट काढण्यास भाग पाडल

जॅकेटचा काळा रंग हा निषेधाचे प्रतिक असल्याने पोलिसांनी ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणी संशोधन विधेयकाच्या विरोधातील वातावरण आहे. मुख्यमंत्री सोनोवाल आणि इतर भाजपाच्या मंत्र्यांच्या अनेक सार्वजनिक ठिकाणी काळे झेंडे दाखवण्यात येत आहेत.

इतर महत्वाचे –

बिकिनी उतरवून “All We Need is Freedom” म्हणणारा हा व्हिडीओ होतोय व्हायरल

धक्कादायक! भाजप नेत्याकडून शेतकरी कुटुंबाला खड्डयात टाकून जेसीबीच्या साहाय्याने बुजवण्याचा प्रयत्न

पती करतात ‘या’ ५ कारणांमुळे पत्नीवर संशय