कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
आंबे आईचा आशीर्वाद घेण्यासाठी चाललो आहे. एवढा मोठा पोलिस बंदोबस्त घोटाळेबाज हसन मुश्रीफ याला अटक करण्यासाठी सरकारने वापरायला पाहिजे होता, असा हल्लाबोल भाजप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला.
सातारा येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. किरीट सोमय्या म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मला गणेश विसर्जन करून देणार नव्हते. मात्र मी मिरवणुकीत सहभागी झालो, गणपती विसर्जन केले. आता आंबे आईचा आशीर्वाद घेणारच, तो मला मिळणारच.
https://www.facebook.com/1506067669510655/posts/4287985877985473/
किरीट सोमय्या यांना पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास महालक्ष्मी एक्सप्रेस मधून कराड येथे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तेथून त्यांना शासकीय विश्रामगृहात पोलीस बंदोबस्तात स्थानबद्द केले आहे. आज सोमवार दि. 20 रोजी सकाळी आठ वाजता त्यांची याबाबत पत्रकार परिषद होणार आहे.