Thursday, October 6, 2022

Buy now

पोलिस दलातील तिघे निलंबित : शिरवळ येथील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरण

सातारा | शिरवळ येथील विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाण प्रकरणात सातारा पाेलिस दलातील दाेन पोलिस कर्मचारी आणि होमगार्ड निलंबित करण्यात आली आहे. याबाबतची माहिती पाेलिस दलातील वरिष्ठ अधिकारी अजित बोऱ्हाडे यांनी दिली

शिरवळ येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना चार पोलिसांनी बेदम मारहाण केली असा विद्यार्थ्यांचा आराेप आहे. दरम्यान, याबाबत वरिष्ठ पाेलिस अधिकारी बोऱ्हाडे म्हणाले, संबंधित वसतीगृहात विद्यार्थ्यांचा रात्री गाेंधळ सुरु असताे अशी स्थानिकांची तक्रार हाेती. त्याची शहनिशा करण्यासाठी 2 पाेलिस कर्मचारी आणि हाेमगार्ड गेले हाेते. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आम्हांला पाेलिसांनी मारहाण केल्याचे म्हटलं आहे. त्याची काही छायाचित्र समाज माध्यमातून व्हायरल हाेत आहेत.

एसपींनी स्वतः याबाबत दाेन वरिष्ठ अधिकारी यांनी अहवाल देण्यास सांगितलं आहे. दरम्यान चाैकशी अहवाल आल्यानंतर याेग्य ती कार्यवाही केली जाईल. तूर्तास दाेन पाेलिस कर्मचारी आणि हाेमगार्ड यांनी निलंबित केल्याचे बाे-हाडे यांनी नमूद केले