‘हे सोनू सूदचं एकट्याचं डोकं नाही, नक्कीच त्याला कोणीतरी मदत करतय – राज ठाकरे

मुंबई | लॉकडाऊनच्या काळात परराज्यातील मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत करणारा अभिनेता सोनू सूद याच्या कामाचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कौतुक केलं आहे. मात्र, सोनू सूद करत असलेल्या कामाचा धडाका आणि त्याची क्षमता याबाबत त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल आहे. ‘सोनू सूदला कोणाचं आर्थिक पाठबळ आहे ते भविष्यात कळेलच,’ असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी सोनू सूदनं मोफत बसगाड्यांची व्यवस्था केली. रेल्वे गाड्यांची व्यवस्था केली. स्थलांतरितांसाठी संकटमोचक ठरलेल्या सोनूच्या कामाचं सर्वत्र कौतुक झालं. मात्र, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्याच्याबद्दल लेख लिहिल्यानंतर त्याचं भाजपशी कनेक्शन असल्याची चर्चा होऊ लागली. त्यावरून बरीच चर्चा झाली. मात्र, सोनू सूदनं काम सुरूच ठेवलं. आताही तो कोकणातील गणेशभक्तांसाठी गाड्यांची व्यवस्था करत आहे. याबद्दल राज ठाकरे यांना विचारलं असता त्यांनी सोनूच्या आर्थिक क्षमतेबद्दल शंका उपस्थित केली. ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीवरील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

सोनू सूद चांगलं काम करतोय. इतरांसाठी काम करण्याची सगळ्यांची इच्छा असते, पण आर्थिक परिस्थितीमुळे ते करता येत नाही. सोनू सूद जे काम करतोय ते त्याचं एकट्याचं डोकं आहे असं मला वाटत नाही. त्याला कोणीतरी आर्थिक मदत करत असावं. तो काही काही एवढा मोठा कलाकार नाही किंवा श्रीमंत नाही. तो चांगला अभिनेता असेलही, पण त्याची आर्थिक बाजू इतकी भक्कम नाही. तरीही तो मदत करतोय. त्याची आर्थिक स्थिती काय आहे? त्यामागे कोण आहे?, हे एकदा तपासलं पाहिजे,’ असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com