धनगरांना आरक्षण देण्याची सरकारची इच्छा नाही – अजित पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बारामती | ‘धनगर समाजाला आरक्षण देण्याची राज्यातील सरकारची इच्छा नाही. वेगवेगळ्या चौकशी समित्या नेमून सरकार धनगर आरक्षणासंदर्भात चालढकलपणा करत आहे.’ असे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काल सत्ताधारी भाजपवर निशाना साधला. ‘या सरकारला धनगरांना आरक्षण द्यायचेच नाही. जर द्यायचे असते तर धनगरांचे सर्वेक्षण आणि संशोधन टाटा इन्स्टिट्यूट ला का दिले ? असा सवाल पवार यांनी बारामतीत केला आहे.

शरद पवार यांनी धनगर समाजाला राज्यात आरक्षण देण्यासाठी धनगर समाजाचे नेते शिवाजीराव शेंडगे यांच्याशी चर्चा करून लगेच निर्णय घेतला होता. तशी तत्परता हे सरकार कधी दाखवणार असा प्रश्नही अजित पवार यांनी सरकारला विचारला आहे.

अहिल्या विकास प्रतिष्ठान आयोजित अहिल्या समाजरत्न पुरस्कार वितरण समारंभात अजित पवार बोलत होते. ‘धनगरांना आरक्षण देण्याचा अधिकार केंद्र सरकारचा आहे. परंतु आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आम्हाला दिल्लीत दिली जात नाहीत. धनगर आरक्षणाच्या बाबतीत राज्य आणि केंद्र सरकार नेहमी टाळाटाळ करतात’ असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रकाश शेंडगे, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, आ. दत्तात्रय भरण, पुणे जि.प अध्यक्ष विश्वास देवकाते आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment