माढा उमेदवारीसाठी रोहित आणि पार्थ पवारांच्या नावांमुळे मोहिते-पाटील गट अस्वस्थ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

करमाळा | राष्ट्रवादीचे प्रभुत्व असणाऱ्या माढा लोकसभा मतदारसंघात पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुकांची नावे दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. विद्यमान खा. विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी मागील काही दिवसांपासून आगामी निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरु केली. तर दुसरीकडे पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सोलापूर जिल्ह्यात केलेल्या दौऱ्यावरून या मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्यात यावी अशी चर्चा रंगली आहे. तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांचे नाव देखील एका गटाकडून समोर येत आहे.

या सर्व प्रकारावरून आगामी लोकसभेला माढा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्यासाठी रस्सीखेच सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून पवार घराण्यातील दोन्ही सुपुत्रांची नावे समोर येत असल्याने मोहिते-पाटील गटात अस्वस्थता पसरली आहे .

२०१४ साली शरद पवार यांनी लोकसभा न लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघातून त्यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी दिली. त्यावेळीस अटीतटीच्या लढतीत विजयसिंह मोहिते-पाटील विजयी झाले होते. तेव्हापासून हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीकडून पवार यांचे नातू रोहित आणि पार्थ पवार यांच्या नावांची चर्चा रंगली असून दोघांनाही जिल्ह्यामध्ये असणाऱ्या युवक कार्यकर्त्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मोहिते-पाटील यांची डोकेदुखी वाढली आहे.

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि  हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी  आजच आमचा  WhatsApp  ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729

Facebook Page – Hello Maharashtra

 

इतर महत्वाचे –

इथून लढवू शकतात रोहित पवार विधानसभा निवडणूक

रोहित पवार आगामी लोकसभेत शिवसेनेच्या आढळरावांना पुरून उरणार?

शरद पवार पुण्यातून लढवणार लोकसभा ?

Leave a Comment