मोठी बातमी: प्रजासत्ताक दिनी राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही; महाराष्ट्र व बंगालचा प्रस्ताव फेटाळला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही. राजपथावर होणाऱ्या संचलनासाठी महाराष्ट्राने पाठवलेला प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. या वर्षीच्या संचलनासाठी महाराष्ट्राने मराठी रंगभूमीची १२५ वर्षे या थीमवर चित्ररथ साकारण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र हा प्रस्ताव नाकारण्यात आला आहे. महाराष्ट्रा पाठोपाठ पश्चिम बंगालचाही प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा प्रस्ताव फेटाळल्यामुळे या मागे राजकीय कारण असल्याची शक्यता आहे.

२०१८ मध्ये महाराष्ट्राने सादर केलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या चित्ररथाला प्रथम पारितोषिक मिळाले होते. २०१५मध्ये देखील पंढरीची वारी या चित्ररथाला प्रथम पारितोषिक मिळाले होते. राजपथावर प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ नेहमीच प्रभावी ठरत आला आहे. मात्र या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्रचा चित्ररथ दिसणार नाही.

Leave a Comment