१०० टक्के लॉकडाउन आता योग्य नाही; कोरोनासोबत जगावचं लागेल- नितीन गडकरी

मुंबई । देशात पुन्हा १०० टक्के लॉकडाउन योग्य नसल्याचं मत व्यक्तीगत मत मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. कोरोनाचं संकट सगळ्या जगावर आहे. प्रत्येक देशाने काय केलं आणि तिथे काय झालं ते आपण पाहिलं. लॉकडाउन करणं हा एकच रामबाण उपाय असं कुणीही ठामपणे सांगू शकत नाही. संक्रमण न वाढता आपलं जीवन सुरळीत करणं हे आव्हान आपल्याला पेलावचं लागणार आहे असंही गडकरींनी सांगितलं. ‘माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन’ या ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

लॉकडाउन वाढवला गेला तर मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकट येणार आहे. त्यामुळे सगळे उपाय योजून कोरोनासोबत जगणं आवश्यक आहे. तसंच कोरोनावरची लस मिळेपर्यंत तारेवरची कसरत करावीच लागेल असं परखड मतही गडकरींनी व्यक्त केलं. सोशल डिस्टन्सिंग, हात धुणे, मास्क लावणे हे उपाय योजून उद्योग सुरु करावेच लागतील. केंद्र सरकारने दिलेल्या गाईडलाइन्स पाळून आपले व्यवसाय, व्यवहार सुरु करणं हे महत्त्वाचं आहे असंही गडकरींनी यावेळी स्पष्ट केलं. कोरोनासोबत जगणं आपल्याला शिकावंच लागेल. समोर आलेल्या समस्येतून मार्ग काढून पुढे जावंच लागेल. आत्ताची वेळ राजकारण करण्याची नाही असंही गडकरींनी म्हटलं आहे.

भारत सरकारचा महसूलही कमी झाला आहे. कोणतंही राजकारण न करता या समस्येतून वाट काढावी लागणार आहे. जनधन योजनेत आम्ही ३८ कोटी खाती उघडली. सरकार म्हणून आम्ही जनतेच्या मागे आहोतच. आता आमची जबाबदारी संपली असं सरकारने कधीही म्हटलेलं नाही. केंद्राची जबाबदारी संपलेली नाही. आत्मविश्वासाने मोदी सरकार सगळ्यांच्या मागे उभं आहे असंही गडकरी यांनी स्पष्ट केलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com