आज GST कौन्सिलची महत्वाची बैठक; ‘या’ वस्तू स्वस्त होण्याची शक्यता

नवी दिल्ली । वस्तू व सेवा करासाठी (GST ) नेमण्यात आलेल्या GST कौन्सिलची ४१ वी बैठक (41st gst council meeting today) आज गुरुवारी सकाळी ११ वाजता होणार आहे. कोरोनाचा प्रकोप पाहता आजच्या GST कौन्सिलच्या बैठकीत कर कपातीची दाट शक्यता आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आजची GST कौन्सिलची ४१ वी बैठक होणार आहे. कोरोनामुळे ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सने होणार आहे. यापूर्वी १२ जून रोजी जीएसटी कौन्सलची बैठक झाली होती. या बैठकीत राज्यांना GST परतावा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या बैठकीत सरकारकडून निवडक वस्तूंच्या करात कपात करून सर्वसामन्यांना दिलासा देण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

आजच्या बैठकीत आणखी काही वस्तूंच्या करात कपात किंवा त्यांचा कर स्तर बदलला जाण्याची शक्यता आहे. विशेषतः दुचाकीवरील आणि आणखी काही दैनंदिन वस्तू, वैद्यकीय उपकरणे यांवरील जीएसटी कर कमी केला जाण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. यामुळे आज शेअर बाजारात टीव्हीएस, हिरो मोटो कॉर्प या कंपन्यांचे शेअर तेजीत आहेत. सध्या GST ५, १२, १८ आणि २८ टक्के असा कर स्तर आहे. दुचाकीवर २८ टक्के जीएसटी आहे.

दोनच दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री दिवंगत अरुण जेटली यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त केंद्र सरकारने GST कराचा पट जनतेसमोर मांडला होता. १ जुलै २०१७ रोजी देशात जीएसटी लागू करण्यात आला. तेव्हापासून जीएसटी करदात्यांच्या संख्या दुप्पट झाली आहे. तर जवळपास २०० वस्तू आणि सेवांचे कर या दरम्यान झालेल्या बैठकांमध्ये कमी करण्यात आले, असे सरकारने म्हटले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook