मेट्रो कारशेडची जागा राज्य सरकारचीच – आदित्य ठाकरेंचा दावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कांजूरमार्ग मेट्रो शेडच्या जागेवरून राज्य आणि केंद्र सरकार मध्ये वाद सुरू असतानाच त्यात आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी उडी घेतली आहे. कांजूरमार्गची जागा ही राज्य सरकारचीच आहे असं आता आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. महसुली  नोंदीनुसार ही जागा राज्य सरकारची आहे असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

यासंदर्भात आदित्य ठाकरे यांनी ट्विट केलं आहे. महसुली नोंदीनुसार कांजूरमार्गची जागा ही राज्य सरकारचीच आहे. जिल्हाधिकाऱ्याने ही जागा एमएमआरडीएला कारशेड डेपो तयार करण्यासाठी दिली आहे. तशी नोंदच महसूल विभागाच्या खात्यात आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच ही जागा एमएमआरडीएला देण्यात आल्याचंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

 

आदित्य ठाकरे यांनी केलेल्या या दाव्यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने या जागेवर दावा केल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी राजकीय प्रतिक्रिया दिल्या होत्या. मात्र, आता आदित्य ठाकरे यांनी डिटेल माहिती दिल्याने त्यावर भाजप काय प्रतिक्रिया व्यक्त करते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे

नक्की काय आहे प्रकरण?
आरेला पर्याय म्हणून मेट्रो कारशेडसाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या कांजूरमार्गच्या जागेवर केंद्राने दावा केला आहे. ही जागा आपल्या मालकीची असून, ती मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाला हस्तांतरित करण्याचा निर्णय रद्द करण्याची सूचना केंद्राने राज्याला केली आहे. त्यामुळे मेट्रो कारशेडच्या जागेवरून केंद्र विरुद्ध राज्य असा संघर्ष निर्माण होताना दिसत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment