नगरचे नगरसेवक म्हणतात “कोणता झेंडा घेऊ हाती?”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर प्रतिनिधी

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे महापालिकेच्या नगरसेवकांच्या मनात द्विधा परिस्थिती निर्माण झाली आहे़. कोणता झेंडा घेऊ हाती अशाच काहिशा चक्रात नगर मधील नगरसेवक अडकले आहेत. अहमदनगर शहरातील एक गठ्ठा मते कोणाच्या पदरात पडणार यावर नगरचा खासदार ठरणार असल्याने नगरसेवकांची मोट बांधण्याचे आव्हान स्थानिक नेत्यांसह उमेदवारांसमोर उभे ठाकले आहे.

लोकसभेची सर्वाधिक मते नगर शहरात आहेत. लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून डॉ़ विखे यांनी प्रथमच महापालिका निवडणुकीत लक्ष घातले हिते पण त्यांना त्यात फारसे यश आले नाही. काँग्रेस आघाडीविरोधात सेना-भाजपाने स्वतंत्र निवडणूक लढविली. सेनेचे २४, तर भाजपाचे १४ नगरसेवक निवडून आले.

भाजप प्रवेशानंतर विखे यांनी महापालिकेत सर्वाधिक संख्याबळ असलेल्या सेनेशी जवळीक साधली़ अर्थात सेनेची मते, हा त्यामागील हेतू आहे. महापालिकेत राष्ट्रवादीचे १८ नगरसेवक निवडून आले. त्यांनी सत्ता स्थापनेत भाजपाला साथ दिली़ मात्र ज्या नेतृत्वाने हा निर्णय घेतला त्यांनाच आता राष्ट्रवादीकडून मैदानात उतरविले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे विखे की जगताप, असा पेच सर्वच नगरसेवकांसमोर आहे.

Leave a Comment