अण्णा उठा ….आंदोलनाची वेळ झाली! जितेंद्र आव्हाडांचा अण्णा हजारेंना टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ठाणे प्रतिनिधी । गेले काही दिवस सुरु असलेल्या सत्ता स्थापनेच्या मुद्दयांवर लवकरच पडदा पडण्याची शक्यता आहे. शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यास काँग्रेस नेतृत्वाने गुरुवारी मान्यता दिली. काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पक्षाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत शिवसेनेशी आघाडी करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे राज्यामध्ये शिवसेना- काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार येणार हे निश्चित झाले आहे. दरम्यान आता सत्ता स्थापनेच्या याच मुद्दयावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना टोला लगावला आहे.

“अण्णा, उठा उठा सत्ता गेली आंदोलनाची वेळ झाली,” असा टोला आव्हाड यांनी ट्विटवरुन हजारे यांना लगावला आहे. आव्हाड यांनी केलेल्या ट्विटमध्ये हजारे यांचा झोपलेला फोटोही अटॅच करण्यात आला आहे. “अण्णा उठा कामाला लागावे लागेल. रामदेव बाबा आहेत तयार. उठा उठा सत्ता गेली… आंदोलनाची वेळ आली..” असं आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. दरम्यान समजावसेवक अण्णा हजारे हे भाजपा विरोधात आंदोलन करत नाहीत अशी टीका त्यांच्यावर विरोधकांकडून केली जाते. यावरुनच आव्हाड यांनी सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर अण्णांवर निशाणा साधला आहे.

Leave a Comment