शासन म्हणून तुम्ही काही करणार आहात की नाही? ; आशिष शेलार ठाकरे सरकारवर बरसले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या चार ते पाच महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा २३ नोव्हेंबरपासून उघडण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मात्र, करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्यानं मुंबई व ठाण्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. त्यावरून संभ्रम निर्माण झाला असून, भाजपाने याचं मुद्यावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत “महाराष्ट्रात सरकार आहे की छळछावणी?,” असं ठाकरे सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.

आशिष शेलार यांनी आज ट्विट करुन राज्य सरकारला काही सवाल केले आहेत. शेालार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, शाळा सुरु करण्याबाबत स्थानिक प्रशासनाची भूमिका महत्त्वाचीच आहे, पण शासन म्हणून तुम्ही काही करणार आहात की नाही? शिक्षक, संस्थाचालक, पालक संघटना, पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन सरकार काही ठोस भूमिका घेणार की नाही?

शेलार यांनी म्हटलं आहे की, कोरोनामुळे सध्या पालक आणि विद्यार्थी प्रचंड संभ्रमात आहेत, भयभीत आहेत. परिक्षा घेण्यावरुन पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये अनेक संभ्रम आहेत. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा घेण्यात आल्या, परंतु त्यावेळीही पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप झाला. अॅडमिशनवरुनही गोंधळ झाला होता. शालेय शुल्क वाढीबाबतही (Fees) शासन हतबल आहे. अभ्यासक्रमाबाबत प्रश्नचिन्ह आहे. शाळा सुरू करण्यातही सावळागोंधळ सुरु असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच महाराष्ट्रात सरकार आहे की छळछावणी? असा संतप्त सवालही शेलार यांनी केला आहे.

 

राज्यातील नववी ते बारावीचे वर्ग सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने शुक्रवारी मागे घेतला आणि शाळा सुरू करण्याच्या जबाबदारीचे ओझे स्थानिक प्रशासनांवर टाकले. त्यानुसार मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील प्रशासनांनी ३१ डिसेंबपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook