प्रणव मुखर्जी आमचे खरे मित्र ; बांगलादेशने जाहीर केला राष्ट्रीय दुखवटा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे काल दुःखद निधन झाले. प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर देशभरातुन नेत्यांनी दुःख व्यक्त केलं.देशभरातूनच नव्हे तर जगभरातून प्रणव मुखर्जी यांच्यासाठी शोक व्यक्त केला जातं आहे. त्यातच आता मुखर्जी यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशने उद्या (बुधवारी) राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यामुळे देशात सर्वत्र बांगलादेश आपला राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवणार आहे. प्रणव मुखर्जी हे आमचे खरे मित्र होते असं बांगलादेशनं म्हटलं आहे.

सन १९७१ मध्ये बांगलादेश मुक्तीयुद्धात महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल सन २०१३ मध्ये भारताचा शेजारी देश असलेल्या बांगलादेशने प्रणव मुखर्जी यांना ‘बांगलादेश मुक्तीजीदो सोम्मानोना’ या पुरस्काराने सन्मानित केले होते. प्रणवदांच्या निधनानंतर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून म्हटलं की, “प्रणव मुखर्जी हे बांगलादेशचे खरे मित्र होते. बांगलादेशी जनता त्यांच्यावर खूप आदर आणि प्रेम करीत होती.”

“प्रणव मुखर्जी दक्षिण आशियातील अत्यंत आदरणीय नेते होते. अथक परिश्रम करणारे भारतरत्न प्रणव मुखर्जी हे केवळ भारतातीलच नव्हे तर दक्षिण आशियातील देशांच्या पुढच्या पिढीतील नेत्यांना कायमच प्रेरणा देत राहतील. भारत-बांगलादेश या दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यासाठी त्यांचा कायमच पाठिंबा राहिला होता,” असं शेख हसीना यांनी म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment