नाती गेली जळून, जनाबाईच्या पार्थिवाला नगर परिषदेकडून ‘अग्नीडाग’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड, प्रतिनिधी, नितीन चव्हाण : आयुष्याच्या उतरत्या वयात नातेवाईकांचा गोतावळा असतांनाही अनाथ म्हणून जीवन जगल्या. वृध्द झाल्याने त्या दि.24 जानेवारी रोजी मरण पावल्या. पोलीसांनी नातेवाईकांना कळवून चार दिवस उलटल्यानंतरही नातेवाईकांनी पाठ फिरविल्याने जनाबाईच्या पार्थीवाला बीड नगर पालिकेकडून दि. 28 जानेवारी 2020 रोजी बेवारसाचा अग्नीडाग  देत अत्यंसंस्कार करण्यात आले.


बीड शहरातील भाजी मंडई परिसरात 21 जानेवारी रोजी काही सामाजिक कार्यकर्त्यांना एक वृध्द आजी आजारी असल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ त्यांना जिल्हा रुग्णालय बीड येथे दाखल केले. कार्यकर्ते आणि पोलीसांनी ओळख पटविली असता नाव जनाबाई आश्रुवा कागदे (रा.मोरगाव ता.जि. बीड) असल्याचे समजले. 24 जानेवारी रोजी दुपारी जनाबाईंनी अखेरचा श्‍वास घेतला. रुग्णालय चौकीतील पोलीसांनी नातेवाईकांना निरोप दिला.

जिवंत असताना घराबाहेर पडल्यानंतर बीडमध्ये फिरून पोट भरले. नातेवाईक असतानाही अनाथ जीवन जगले. आता वृध्द झाल्याने 85 वर्षी मरण आले. चार दिवस उलटूनही एकही नातेवाईक आलेला नसल्याने अंत्यसंस्कार रखडून मृतदेह शवागृहात ठेवला ठेवण्यात आले होते. मात्र कुणीच येत नसल्याने जिल्हा रुग्णालय चौकीतील पोलीसांनी बीड नगर पालिकेला बेवारस असल्याचे पत्र देत अंत्यविधी करण्याचे सांगितले. 85 वर्षीय जनाबाईने जिवंतपणी तर त्रास भोगलाच परंतू आता मृत्यूनंतरही यातना सहन कराव्या लागल्याअसून दि.28 जानेवारी रोजी नगर पालिका बीड यांच्याकडून जनाबाई यांच्या पार्थीवावर अत्यसंस्कार करण्यात आले.

जग दिवसेंदिवस प्रगतीपथावर जात असतांनाच आपण आपले संस्कार व संस्कृती विसरत चाललो की काय असा प्रश्‍न उपस्थि होत आहे. शहरामध्ये मिळेल ते अन्न आणि दिसेल तिथे निवारा करत मोरगाव येथील जनाबाई कागदेला भलामोठा गोतावळा असतांनाही अनाथ म्हणून त्यांनी जीवन जगले. मात्र जीवंतपणी नाही बघीतले तरी मृत्यूनंतर नातेगोत्यातल्यांनी आणि नातेवाईकांनी त्यांच्या पार्थीवाचा अत्यंसंकार करणे हे हिंदू संस्कृतीमध्ये सुजलेले आहे. परंतू एकविसाव्या शतकामध्ये ही संस्कृती व संस्कार लोकपावत चालले असून नातेवाईकांनी पार्थी नेण्यासाठी पाठ फिरविली असल्याने जनाबाईच्या पार्थीवाला बेवारसाचा डाग देत नगर पालिकेने अग्नीडाग दिला आहे.

Leave a Comment