धुळे-नंदुरबारमध्ये महाविकास आघाडीला धक्का ; भाजपच्या अमरीश पटेल यांचा दणदणीत विजय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र विधान परिषदेच्या धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा मतमोजणीला निकाल लागला असून भाजपनं या निवडणुकीत बाजी मारली आहे. भाजपचे अमरीश पटेल यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीच्या बॅनरखाली निवडणूक लढणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा तब्बल २३४ मतांनी पराभव झाला आहे.

राज्यात महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर ही पहिली मोठी निवडणूक असल्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपने ताकद पणाला लावली होती. विधानपरिषदेच्या निकालाचा महाराष्ट्रातील आगामी राजकारणावर परिणाम दिसून येतील.

धुळे-नंदुरबारमधून भाजपचे अमरीश पटेल यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांना ३३२ मते मिळाली आहेत. तर, पटेल यांचे निकटचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांना अवघ्या ९८ मतांवर समाधानं मानावं लागलं आहे. चार मते बाद झाली आहेत. या निवडणुकीत एकूण ४३७ मतदारांपैकी ४३४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार पोटनिवडणुकीसाठी 1 डिसेंबरला 99 टक्के मतदान झालं होत. काँग्रेसमधून भाजपात आलेले अमरिश पटेल आणि भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या अभिजीत पाटील या दोघांमधून कोण बाजी मारणार, याची उत्कंठा ताणली गेली होती.  अखेर चित्र स्पष्ट झालं असून, भाजपचे अमरिश पटेल विजय झाले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment