कोरोना संकटात फडणवीस आणि भाजपानं राजकारण करू नये; शरद पवारांनी विरोधकांना फटकारले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक । राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापूरनंतर आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. नाशिक जिल्ह्यातही करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येनं झाला असून, प्रसार नियंत्रणासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा पवारांनी आढावा घेतला. आढावा घेतल्यानंतर पवार यांनी पत्रकार परिषदेतून माध्यमांशी संवाद साधला. कोरोना संकटाच्या काळात देवेंद्र फडणवीस आणि भाजपने राजकारण करू नये, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी विरोधकांना फटकारले. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नाशिकला भेट देण्याची इच्छा आहे, ते येतीलच. पण आम्ही आमचे निरीक्षण घेत आहोत. मुख्यमंत्री धोरणात्मक निर्णय घेतील. मात्र, देवेंद्र फडणवीस व भाजपानं राजकारण करू नये,” अशी टीका पवार यांनी केली.

”महाराष्ट्रातील जनतेचं आम्ही देणं लागतो. फडणवीसांनी देखील या कामात लक्ष घालावे आणि राजकारण करू नये,” असा सल्ला पवार यांनी दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना संकटात पूर्ण काम करत आहेत, असं सांगत पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचं कौतुक केलं. आम्ही फिल्डवर जाऊन परिस्थिती बघून त्याची माहिती मुख्यमंत्र्यांना देत आहोत आणि त्यानंतर धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री घेत आहेत, असंदेखील पवारांनी स्पष्ट केलं.

तर डॉक्टरांवर कारवाई कारवाई लागणार
नाशिक शहरामध्ये रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता बेड उपलब्ध करून देणे तसेच जास्तीत जास्त टेस्टिंग करणे महत्त्वाचे असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. खासगी रुग्णालये जास्तीचं बिल घेत आहेत. त्यांचे ऑडिट केलं जात असून, यापुढे कडक तपासणी केली जाणार आहे. नाशिकमध्ये आरोग्य विज्ञान विद्यापीठ असल्याने डॉक्टरांची कमतरता भासणार नाही, मात्र जर डॉक्टर टाळाटाळ करत असतील तर मात्र आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत कारवाई करावी इशारा देखील पवार यांनी दिला.

भाजपच्या आक्षेपामुळं भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
भाजपने एका शासन निर्णयाचा आधार घेत शरद पवार यांच्या नाशिकमधील आढावा बैठकीला आक्षेप घेतला होता. त्यामुळे वाद टाळण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीला शरद पवार भुजबळ यांच्या बाजूला बसले होते. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, कृषीमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे बैठकीला व्यासपीठावर होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment