आरे कारशेड कांजुरमार्गला हलविण्याचा निर्णय केवळ अहंकारातुन – फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल फेसबुक लाइव्ह द्वारे जनतेशी संवाद साधला. त्यातून त्यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टीवर भाष्य करताना आरेतील मेट्रो कारशेड ही कांजुरमार्ग येथे हलविणार असल्याची माहिती दिली. उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयानंतर यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. यामध्ये विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकार वर टीका करताना हा निर्णय़ अहंकारातून घेतला गेल्याची प्रतिक्रिया दिली.

आरे येथील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथे हलविण्याचा दुर्दैवी निर्णय हा केवळ अहंकारातून झाला आहे. कांजूरमार्गला मेट्रो कारशेड नेल्यास 4000 कोटी रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागेल, असे याच सरकारने स्थापन केलेल्या समितीने सांगितले. हा भुर्दंड राज्य सरकार आपल्या अहंकारासाठी कुणाच्या माथी मारू इच्छिते? आणि कशासाठी?’ असे प्रश्न विचारत देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या निर्णयावर टीकास्त्र सोडलं आहे.

कांजूरमार्गच्या जागेचा यापूर्वी सरकारने विचार केला. पण त्यावर मा. उच्च न्यायालयाची स्थगिती होती. काही खाजगी व्यक्तींनी त्या जागेवर दावा सांगितला. स्थगिती मागे घ्यावी, म्हणून विनंती करण्यात आली, तर न्यायालयाने दावे पुढील काळात निकाली निघाले, तर त्यासाठीची रक्कम भरण्यास सांगितले. ही रक्कम 2015 मध्ये सुमारे 2400 कोटी रुपयांच्या आसपास होती. आज त्या प्रकरणाची सद्यस्थिती काय? प्रकरण पुन्हा मा. सर्वोच्च न्यायालयात गेले तर विलंबाला जबाबदार कोण?

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment