भाजपने राजस्थानमध्ये घोडेबाजार केला असून माझ्याकडे त्याचा पुरावा- मुख्यमंत्री अशोक गेहलोत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जयपूर । राजस्थानमधील काँग्रेस सरकारवरील अस्थिरतेचे संकट कायम असून राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सचिन पायलट यांनी भाजपा नेत्यांसोबत मिळून राज्य सरकार पाडण्याचं षडयंत्र रचल्याचा आरोप मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे. याशिवाय मुख्यमंत्री गेहलोत यांनी पुन्हा एकदा भाजपवर घोडेबाजार केल्याचा आरोप केला आहे.

“जयपूरमध्ये घोडेबाजार झाला असून आपल्याकडे पुरावे आहेत. आम्हाला १० दिवसांसाठी आमच्या लोकांना हॉटेलमध्ये ठेवावं लागलं. अन्यथा मनेसर येथे जे झालं तेच येथेही होताना दिसलं होतं,” असं मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी म्हटलं आहे. सचिन पायलट यांच्या बंडखोरीवर भाष्य करताना मुख्यमंत्री गेहलोत म्हणाले कि, “मी गेल्या ४० वर्षांपासून राजकारणात आहे. नव्या पिढीवर आमचंही प्रेम आहे. शेवटी भविष्य त्यांचंच आहे. नवीन पिढी केंद्रीय मंत्री, प्रदेशाध्यक्ष पद भूषवत आहे. आमच्यावेळी आम्हाला ज्या परिस्थितीचा सामना करावा लागला होता तो यांनी केला असता तर कळलं असतं.”

“उत्तम इंग्लिश बोलणे, प्रसारमाध्यमांना चांगले बाइट देणे, हॅण्डसम दिसणे हेच सर्वकाही नसतं. देशासाठी तुमच्या मनात काय आहे, तुमची विचारसरणी, धोरणं आणि कटिबद्धता प्रत्येक गोष्ट महत्त्वाची असते,” अशी उपरोधिक टीकाही अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट यांच्यावर केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment