राज्यसभा नाही दिली किमान विधानपरिषदेची तर जागा द्या!- एकनाथ खडसे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव । येत्या 21 मे रोजी महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी मुंबईत निवडणूक होणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षानं उमेद्वारीपासून डावलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी विधानपरिषदेच्या जागेची उमेदवारी देण्याची मागणी भाजपकडे केली आहे. राज्यसभेच्या जागेसाठी शिफारस होऊनही निवड झाली नाही, पण आता विधानपरिषदेसाठी तरी माझा विचार करावा, असं भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

गेल्या वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ खडसे यांना भाजपने तिकीट नाकारल होत. परंतु, एकनाथ खडसे यांची नाराजी पाहता त्यांच्या ऐवजी त्यांची कन्या रोहिणी खडसे याना भाजपने तिकीट दिलं, पण रोहिणी खडसेंचा निवडणुकीत पराभव झाला. हा पराभव भाजपचे निष्ठावंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकनाथ खडसे यांच्या जिव्हारी आला. आपली नाराजी त्यांनी वेळोवेळी प्रकट करत त्यांनी राज्यातल्या भाजप नेतृत्वावर उघड टीकाही केली. दरम्यान, एकनाथ खडसे यांनी दिल्लीतल्या पक्ष नेतृत्वाचीही भेट घेतली.

विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक होणार आहे. ९ पेक्षा जास्त उमेदवारांनी विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल केले, तर निवडणूक होणार हे अटळ आहे. ११ मे रोजी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे, तर १४ मे रोजी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. अपक्षांसह भाजपकडे असलेलं संख्याबळ लक्षात घेता भाजपचे ४ उमेदवार सहज विजयी होतील असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

विधानपरिषद निवडणुकीतील सुत्रानुसार उमेदवाराच्या विजयासाठी २९ मतांचा कोटा आवश्यक आहे. भाजपच्या १०५ आमदारांबरोबर १४ अपक्ष बरोबर असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विधिमंडळ सदस्य होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान आज शिवसेनेने विधानपरिषदेच्या जागेसाठी उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांचं नाव जाहीर केलं आहे. दरम्यान महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी आणि काँग्रेस याच्याकडून अद्याप उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आलेली नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment