महाविकास आघाडी सरकारमधील अर्ध्या मंत्र्यांना वाटत मराठा आरक्षण देऊ नये -गिरीश महाजनांचा गंभीर आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार काहीही प्रयत्न करत नाही असा आरोप सातत्याने विरोधकांकडून केला जातोय. त्यातच आता भाजप नेते आणि माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीही राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. महाविकास आघाडी सरकारमधील अर्ध्या मंत्र्यांना मराठा आरक्षण देऊ नये असं वाटतं, असा गंभीर आरोप  गिरीश महाजन  यांनी राज्य सरकारवर केला . तसेच, मराठा आरक्षण हा केंद्राचा विषय नाही. आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून मराठा आरक्षण दिलं, मराठा आरक्षणासाठी आम्ही केंद्र सरकारकडे जा म्हटलं नाही;  असा टोलाही त्यांनी राज्यसरकारला लगावला. ते जळगावमध्ये माध्यमांशी बोलत होते.

मराठा आरक्षणावरुन राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. एकीकडे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं राज्य सरकारकडून सांगितलं जातं आहे. तर, मराठा आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार गंभीर नाही; असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. या पार्श्वभूमीवर माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी राज्य सरकारला आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चांगलंच घेरल्याचं पाहायला मिळालं.

“राज्यातील जवळपास 90 टक्के समाज हा उपेक्षित आहे. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर आरक्षण मिळावे. कोर्टात तारीख आली तरी सरकार लक्ष ठेवत नाही.” असे ते म्हणाले. तसेच, हे सरकार दिल्लीलाही जात नाही आणि कमिटीही तयार करत नाही, असे म्हणत सरकार आरक्षणाविषयी गंभीर नसल्याचा आरोप त्यांनी केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment