दिल्ली भाजप अध्यक्षपदावरून मनोज तिवारींची उचलबांगडी; चर्चांना उधाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । दिल्लीचे खासदार मनोज तिवारी यांना मोठा धक्का बसला आहे. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी मनोज तिवारी यांना दिल्ली प्रदेश भाजप अध्यक्षपदावरून काढून टाकले आहे. तिवारी यांच्या जागी आदेश गुप्ता यांची वर्णी लागली आहे. आदेश गुप्ता आता दिल्ली प्रदेश भाजपचे अध्यक्ष म्हणून काम पाहतील. या बरोबरच छत्तीसगडच्या प्रदेशाध्यक्षपदी विष्णुदेव साय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनोज तिवारी यांची नेमकी कोणत्या कारणांमुळे उचलबांगडी करण्यात आली याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.

दरम्यान, दिल्ली निवडणूकीत झालेला दारूण पराभव हे मनोज तिवारींना डच्चू देण्यामागील एक कारण सांगितले जाते. दिल्लीत विधानसभा निवडणूक २०२० अर्थात या वर्षी फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आल्या होत्या. या निवडणुकीत भाजपला एकूण ८ जागा मिळाल्या होत्या. पक्षाने ही निवड मनोज तिवारीच्या अध्यक्षतेखालीच लढवली होती.

म्हणून मनोज तिवारींना हटवून भाजपने आदेश गुप्तांकडे दिले अध्यक्षपद
मनोज तिवारी यांना हटवून आदेश गुप्ता यांना दिल्लीच्या अध्यक्षपदी बसवण्यात आले आहे. आदेश गुप्ता एका वर्षापूर्वी उत्तर एमसीडीचे महापौर होते. व्यापारी वर्गाला खूश करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने हा चेहरा पुढे केल्याचे बोलले जात आहे. मनोज तिवारी यांना दूर करून लोकांशी जोडले गेलेले आणि दिल्लीशी थेट संबंध असेलेले गुप्ता यांची निवड भाजपने केली आहे. दिल्लीतून हीच मागणी अनेक दिवसांपासून होत होती. आदेश गुप्ता शिकवणी चालवून आपले घर चालवत असत.

तिवारी काही दिवसापासून होते सापडले होते वादात
लॉकडाउनच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी मनोज तिवारी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतले होते. दिल्लीतील कोविड -१९ विरोधात लढण्यात अरविंद केजरीवाल सरकार कमी पडले असे सांगत सरकारविरोधात निदर्शने करण्यासाठी ते राजघाटवर गेले होते. त्यापूर्वी ते हरयाणात क्रिकेटचा सामना खेळण्यासाठी गेले होते. तेथे मास्क न लावता, तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करता ते क्रिकेट खेळत होते त्यामुळं मोठा वादंग निर्माण झाला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment