संजय राऊतांनी काँग्रेसचे प्रवक्तेपद स्वीकारले आहे का? राधाकृष्ण विखे- पाटलांचा पलटवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । काल शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’तून राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर जळजळीत शब्दांत टीका करण्यात आली होती. विखे-पाटलांसारखी लाचारी अंगात भिनवायला मेहनत करावी लागते, अशी अत्यंत बोचरी भाषा या अग्रलेखात वापरण्यात आली होती. या टीकेला राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंगळवारी पत्रक प्रसिद्ध करून प्रत्युत्तर दिले. यामध्ये विखे-पाटील यांनी संजय राऊतांचा समाचार घेतला आहे.

संजय राऊत यांनी आज शिवसेनेचे प्रवक्तेपद सोडून काँग्रेस समितीचे प्रवक्तेपद स्वीकारले आहे का? आम्ही राजकीय पक्ष बदलले पण ज्या पक्षात राहिलो त्याचे काम निष्ठेने केले. आमची छाती फाडून पाहिली तर एकावेळी एकच नेता दिसेल. पण तुमची (संजय राऊत) छाती फाडून पाहिली तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार असे दोघेही दिसतील. तुमचा हा बेगडीपणा एव्हान लोकांच्या लक्षात आला आहे. एकीकडे राजभवनाबद्दल धमकीवजा भाषा वापरायची आणि दुसरीकडे वाकून, लवून कुर्निसात करायचा हे कोलांटीउडीचे डोंबारी राजकारण आपण किती सहजगत्या करता हे अलीकडे महाराष्ट्राने बघितल्याचे विखे-पाटील यांनी म्हटले आहे.

तसेच मी भाजपमध्ये आनंदी आहे. पण महाविकास आघाडीचा एका शिल्पकार असल्याच्या अविर्भावात राहणाऱ्या व्यक्तीला आपल्या भावास मंत्री देखील करु न शकल्याचे दु:ख असेल आणि त्यातून आलेली अस्वस्थता दाबून ठेवण्याचा नाहक त्रास होत असेल तर त्यात माझा काय दोष, असा खोचक सवाल राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उपस्थित केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment