मी पक्ष सोडला म्हणून बाळासाहेब थोरात यांना प्रदेशाध्यक्ष पद मिळालं- राधाकृष्ण विखे पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन ६ महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र, सरकारमधील सहभागीदार असलेला काँग्रेस पक्ष नाराज असल्याची वृत्त समोर आलं होत. यानंतर सरकारच्या निर्णय प्रक्रियेत स्थान मिळावं अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली होती. यावरून भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडले. “स्वतःच्या स्वार्थासाठी काँग्रेसचे नेते लाचार झाले असून, मी पक्ष सोडला म्हणून बाळासाहेब थोरात यांना अध्यक्ष पद मिळाले. त्यांची स्वतःची कर्तबगारी काय?”, अशी टीका विखे पाटलांनी बाळासाहेब थोरातांवर केली. ते एका वृत्तवाहिनीवर बोलत होते.

विखे पाटील म्हणाले, ”मी पक्ष सोडला म्हणून बाळासाहेब थोरात यांना अध्यक्षपद मिळालं. थोरातांची स्वतःची कर्तबगारी काय? थोरात म्हणजे दिशा हरवलेला माणूस आहे. गेल्या सहा महिन्यात त्यांनी अशी कोणती कर्तबगारी दाखवली. राज्यातील जनतेच्या प्रश्नासाठी बैठक होत नाही, तर आपापसातील वाद मिटवण्यासाठी बैठका होत आहे. काँग्रेसला इतकी लाचारी का करावी लागत आहे? स्वतःच्या स्वार्थासाठी काँग्रेसचे नेते लाचार झाले आहेत. राज्यात काँग्रेसची वाताहत झाली आहे,” असं म्हणतं विखे पाटील यांनी काँग्रेस नेत्यांवर निशाण साधल.

दरम्यान, “राज्यात कोरोनासारखं मोठं संकट असताना राज्य सरकार गोंधळलेल्या अवस्थेत दिसत आहे. कोणताही निर्णय घेताना सरकारमधील तिन्ही पक्षात समन्वय नाही. राज्य सरकारच आज संभ्रमात आहे. मातोश्रीचा रिमोट आता शिवसेनेच्या हातात राहिलेला नाही. सत्तेच्या वाटमारीत शिवसेनेचं मोठं नुकसान होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही मोठी फरफट होताना दिसत आहे. त्यामुळे आता सत्तेत राहायचं की नाही याचा शिवसेनेनं विचार करण्याची वेळ आली आहे”, असंही विखे पाटील म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment